vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नकरणार*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नकरणार*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

    अमरावती, प्रतिनिधी: मेळघाटात रस्ते, पाणी, दळणवळण, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. नागरिकांना या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळण्यासाठी यंत्रणांचा समन्वय असणे आवश्यक आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्राचा विचार करून मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आज मेळघाटातील विविध समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

     शासनाने दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावू नये. यासाठी अग्रणी बँकेनी इतर बँकांसोबत संपर्क साधून सूचना द्याव्यात. मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी दहा गावांचे एकत्रितरित्या पाच वर्षांचे नियोजन करून कामे करण्यात यावी. तसेच इंटरनेट सेवा नसलेल्या गावासाठी हजेरी नोंदणीसाठी पर्यायी उपाययोजना करण्यात यावी. मनरेगा अंतर्गत मिळणारे वेतन विनाविलंब मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

     मेळघाटात प्रामुख्याने वन क्षेत्र असल्याने याठिकाणी होणारे रस्ते सुधारण्यासाठी वन विभागाची परवानगी गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागाने यासाठी पुढाकार घेऊन रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. मेळघाटात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यास येथील स्थलांतरण होणार नाही. तसेच शेतीमधील पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मेळघाटातील 22 गावाच्या पारंपारीक विजेच्या प्रश्नाबाबत राज्याकडून केंद्रीय वन्यजीव मंडळाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंडळाची परवानगी प्राप्त झाल्यानंतरच या ठिकाणी विजेची कामे होण्यास मदत मिळणार आहे.

     आरोग्य सुविधा पुरविण्यासोबतच याठिकाणी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय होण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. तसेच उपकेंद्र स्तरावर रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच एकशिक्षक असणाऱ्या शाळांमध्ये वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. सार्वजनिक दळणवळणाची सुविधा परिणामकारक होण्यासाठी सेमाडोह येथून बसची सुविधा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या00000000

संबंधित पोस्ट

पूरपश्चात व्यवस्थापन तातडीने करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील पूरस्थितीच्या अनुषंगाने घेतला आढावा

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..

प्रतिबंधात्मक प्लास्टिक मोहीमेत प्लास्टिक पिशव्यांची वाहतूक करणा-या टेम्पोवर धडक कारवाई

सांगली पॅटर्न – सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !!बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचेशनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे” 

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी जागा घ्या- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वसतिगृह बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासंबंधी बैठक

vishwatmaklokswamivarta