vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…

 

सातारा प्रतिनिधी : पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युतर देण्यात आलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस मुख्यालयात जाऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्याच्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला

पोलीस मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीस प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपाधिक्षक (गृह) अतुल सबनीस, जिल्हा विशेष शाखचे पोलीस निरीक्षक रविंद्र सावंत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तसेच जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते,

पोलीस यंत्रणेकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्या नंतर भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण आहे. विनाकारण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीसांनी सतर्क रहावे. वाहने सुव्यवस्थित ठेवावीत. जिल्ह्यात सगळीकडे शांत वातावरण असून नागरिकांचा दैनंदिन दिनक्रम शांततेत व सुरळीत सुरु असल्याबाबतचा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून आढावा घेतला.

000

संबंधित पोस्ट

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जनजागृती व प्रत्यक्ष कारवाईवर भर द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन,आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा..दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत’ स्पर्धांचे २९ जुलै रोजी आयोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…