vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अमरावती मुख्य पोस्ट ऑफिसच्या वेळेत वाढआता रात्री 7.30 वाजेपर्यंत पोस्टाचे व्यवहार करता येणार!

अमरावती मुख्य पोस्ट ऑफिसच्या वेळेत वाढआता रात्री 7.30 वाजेपर्यंत पोस्टाचे व्यवहार करता येणार!

 

       अमरावती, प्रतिनिधी भारतीय डाक विभागाने अमरावतीकरांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून, श्याम चौक येथील प्रधान डाकघराच्या कामकाजाच्या वेळेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 25 मार्च 2026 पासून आता नागरिकांना रात्री 7.30 वाजेपर्यंत आपली आर्थिक कामे पूर्ण करता येतील. नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची कार्यालयीन वेळेतील अडचण ओळखून डाक सेवा संचालक डॉ. सुधीर जाखरे यांच्या मार्गदर्शनात ही ‘नाईट पोस्ट’ सुविधा सुरू करण्यात आली आहे.

    या विस्तारित वेळेत बचत खात्यातील व्यवहार, नवीन खाते उघडणे आणि पोस्टाच्या सर्व बचत योजनांशी संबंधित कामे होतील. आज प्रवर अधीक्षक गेडाम आणि सुजितकुमार लांडगे यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. कामावरून घरी परतताना आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

0000000

संबंधित पोस्ट

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

व्यायाम साहित्य व क्रीडा साहित्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

🚀 लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! 🚀

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे रोजगार निर्मिती ला प्राधान्य ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*