vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन

जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन

अहिल्यानगर, प्रतिनिधी – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करून प्रत्यक्ष उपस्थित राहावे व रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.

हा उपक्रम बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, टीव्ही सेंटर, अहिल्यानगर येथे होणार आहे.

या उपक्रमात कार्मी सिस्टीम प्रा. लि., फास्ट टॅग सर्व्हिस प्रा. लि. व पिपाडा किया मोटार्स, अहिल्यानगर या तीन खासगी आस्थापना सहभागी होणार आहेत. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी जागेवरच नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केली नसल्यास, त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. तसेच, उपक्रमाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती द्याव्यात.

उमेदवारांनी www.ncs.gov.in या राष्ट्रीय करिअर सेवा संकेतस्थळावरही नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी समन्वयक वसीम खान पठाण (मो. ९४०९५५५४६५) यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

शबरी घरकुल योजनेतून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्याचा निर्धार   — आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके वतक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता हॉटेलचालकाविरूद्ध एफ. आय. आर.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना  उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत कलम ३७ अन्वये मनाई आदेश लागू

पालकमंत्र्यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन