vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद…

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद…

 

राज्य प्रतिनिधी-सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येतात. या जलाशयाची पाणी पातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी या बंधाऱ्यांच्या बांधकामांसाठी १७० कोटी रुपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.—–०-

संबंधित पोस्ट

लातूरमध्ये ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ मोहिमेचे आयोजन

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी अमित शाह, राजनाथसिंह, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, नीती आयोगात भेट

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण· मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 संदर्भातील राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

28 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर १० नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध

vishwatmaklokswamivarta