vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

28 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन

28 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन

जालना प्रतिनिधी : तहसिल घनसावंगी यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांच्या तातडीने निपटारा व्हावा तसेच नागरीकांना जलद न्याय मिळावा या उद्देशाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 महसुल सेवा पंधरवडा अंतर्गत “ न्याय आपल्या दारी ” या संकल्पनेतुन रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय घनसावंगी येथे लोक अदालत आयोजित केली आहे.

लोक अदालतमध्ये तडजोड होऊ शकणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे तरतुदीनुसार मामलदार कोर्ट ॲक्ट ( 15 च्या कलम 143, कुळकायदा दावे अंतर्गत अर्धन्यायीक प्रकरणांमध्ये समेट/तडजोड करायची असल्यास विहीत नमुन्यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्व संबंधीत नागरीक शासकीय कार्यालये यांना याद्वारे सुचित करावे. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की, अर्धन्यायीक प्रकरणांमध्ये तातडीने न्याय मिळवून घेण्यासाठी या लोकअदालतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपात्रांसह वेळेवर उपस्थित राहावे. अशी माहिती तहसिलदार घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या सूचना

आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍तींनी अर्ज करावेत..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठकशहरी व्यवस्थापनाचा घेतला आढावा,केंद्रीय समितीच्या खासदारांसह खासदार नरेश म्हस्के यांचे विजय थलपती यांनी विधानसभेत केले स्वागत…

vishwatmaklokswamivarta

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांची सामुहिक जबाबदारी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन