vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 29 मार्चला होणार भव्य सत्कार*

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 29 मार्चला होणार भव्य सत्कार

 

मुंबई प्रतिनिधी – राज्यसभेत सलग तिस-यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं येत्या रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता चेंबुरच्या फाईन आर्ट्स सभागृहात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. निळया पगडीचा मुकुट घालुन रिपब्लिकन हदय सम्राट असणारे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा रिपाइंच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी दिली आहे.
 रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सत्कार समारंभास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, राष्ट्रीया नेत्या सिमाताई आठवले, युवानेते कुमार जीत आठवले, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्यासह अनेक मान्यंवर नेते या सत्कार सोहळयास उपस्थित राहणार.
 या सत्कार सोहळयास दक्षिण मध्य मुंबई जिल्हयातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी केले आहे.
0000

संबंधित पोस्ट

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन,पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यात स्वयंसेवी संस्थांना सहभागाचे आवाहन 

गावकर्‍यांचा संताप उसळला; भ्रष्टाचारग्रस्त मुख्याध्यापक चाऊस यांच्या बडतर्फीची मागणी; उपोषणाचा ईशारा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीचे गावकर्‍यांकडून कौतुक; शिक्षक संघटनांच्या दबाव तंत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

vishwatmaklokswamivarta

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

प्रशासन गाँव की ओर’ मोहीम प्रभावीपणे राबवावी  — जिल्हाधिकारी किशन जावळे 

vishwatmaklokswamivarta

वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन· मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न