vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा…

यवतमाळ, प्रतिनिधी : मध्यपूर्व आणि आखाती देशातील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा पालकमंत्री ना. संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री ना .प्रा अशोक उईके यांनी शुक्रवारी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या या बैठकीत आ. राजू तोडसाम, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, मुख्य वनसंरक्षक अभिजीत वायकोस, प्रकल्प अधिकारी अमित रंजन, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पालकमंत्री ना. संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री ना .प्रा अशोक उईके यांनी जिल्ह्यातील गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलच्या उपलब्ध साठ्याची माहिती घेतली. तसेच साठेबाजी, काळाबाजार रोखण्यासाठी पथकांनी कारवाई करावी. अफवांमुळे नागरिकांची संभ्रम निर्माण होत असल्याने तो तातडीने दूर करण्यासाठी जनजागृती करावी. तसेच युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाने सतराक राहून तयारी करावी, वितरण एजन्सीजच्या समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

000000

संबंधित पोस्ट

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘स्वप्ननिकेतन’ सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण; विविध विकास कामांचेही लोकार्पण

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.

आरटीई २५ टक्के जागांच्या नोंदणीला सुरुवात-रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

योगाभ्यासातून शिक्षित, सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक घडविणे आजची गरज – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रतिपादन  > बुलढाण्यात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा > २५०० योगप्रेमींचा सहभाग 

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतल्या निदर्शनांप्रकरणी भारतीय युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब अटकेत.

पुना येथील आधी पर्वती, नंतर सारसबाग, आता शनिवारवाड्यात नमाजपठण…सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी…

vishwatmaklokswamivarta