vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विपश्यना केंद्र, सांस्कृतिक भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

विपश्यना केंद्र, सांस्कृतिक भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, प्रतिनिधी : मार्डी रोडवरील विपश्यना केंद्र आणि सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सांस्कृतिक भवनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले.

लोकार्पण कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, नगरसेविका सुरेखा लुंगारे आदी उपस्थित होते. सुरुवातीला श्री. बावनकुळे यांनी बुद्ध वंदेनेत सहभाग घेतला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि विपश्यना केंद्राची पाहणी केली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शासनाने बांधलेले हे सांस्कृतिक भवन सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहावे. या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांसाठी मदत करण्यासाठी केंद्र उभारावे. तसेच आधुनिक सुविधांनी युक्त इ-लायब्ररी, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे केंद्र उभे करावे. यासोबतच कौशल्य विकासासाठीही प्रयत्न करण्यात यावेत. संस्थेने उभारलेल्या कार्यासाठी सर्वोत्तरी मदत करण्यात येईल.

चांगले जीवनमान घडविण्यासाठी विपश्यना हा सर्वात चांगला मार्ग आहे. संस्कारमय जीवन आणि शांतीसाठी विपश्यनेशिवाय पर्याय नाही. जनतेचे कल्याण करण्याची शक्ती विपश्यनेमध्ये आहे. विपश्यना केल्याने मोठी शक्ती मिळते. यातून समाज विकासाचे कार्य घडण्यास मदत होत असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले

000000

संबंधित पोस्ट

प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्प व प्रेशरमिडच्या वापरास प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तर युवा महोत्सवातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरितायुवक-युवतींनी तसेच युवा मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

दुर्घटनेला जबाबदार कोण? नागरिकांचा संताप — आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारीच जबाबदार?मध्य रेल्वे मार्गावर सँन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघाताने सर्वत्र संतापाची लाट ..

vishwatmaklokswamivarta

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta