vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनगणना कार्य अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**जनगणना प्रशिक्षण संपन्न; डिजिटल जनगणनेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन*

*“जनगणना कार्य अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**जनगणना प्रशिक्षण संपन्न; डिजिटल जनगणनेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन*

गडचिरोली, प्रतिनिधी: “जनगणना ही शासनाच्या नियोजन प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा पाया असून या कार्याची अचूकता व पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणातील सर्व बाबी आत्मसात करून जनगणना कार्य विहीत वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी केले.

जनगणना संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 ते 28 मार्च 2026 या कालावधीत जनगणना-2027 प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, यावेळी होणारी जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार असून त्यासाठी तांत्रिक कौशल्य व अचूक माहिती संकलन अत्यावश्यक आहे. प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक बाब बारकाईने समजून घेतली पाहिजे, जेणेकरून प्रत्यक्ष काम करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. जनगणना प्रक्रियेत लहानसहान त्रुटीदेखील भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवर परिणाम करू शकते, त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व जनगणना अधिकारी, लिपीक व तांत्रिक सहाय्यक यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान जनगणना प्रक्रियेतील विविध टप्पे, माहिती संकलन पद्धती तसेच डिजिटल प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणासाठी जनगणना संचालनालय, मुंबई येथील सहाय्यक संचालक जोगेंद्र तामगाडगे व चेतन गायधाने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशिष वानखेडे व तहसिलदार संतोष आष्टीकर यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

जनगणना-2027 ही देशातील 16 वी व स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असून ती दोन टप्प्यांत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनगणना कार्य अधिक सक्षम व परिणामकारक होण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा आढावा

कृषी विभागाने गावनिहाय शिबिराचे आयोजन करुन ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडामराठी भाषेचे जतन व संवर्धनाची चळवळ-सर्व शासकीय कार्यालयातून उभारावी

vishwatmaklokswamivarta

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन