vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा – पालकमंत्री जयकुमार गोरे महिला कुस्ती स्पर्धेसाठी दरवर्षी ५० लाखांचा निधी शासनाकडून मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवणार

महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा – पालकमंत्री जयकुमार गोरे महिला कुस्ती स्पर्धेसाठी दरवर्षी ५० लाखांचा निधी शासनाकडून मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवणार

सोलापूर, प्रतिनिधी: हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात चौथी महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच विविध गटातील पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी 25 लाखांचा निधी जाहीर केला. तर पुढील वर्षीपासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी 50 लाखाचा निधी देण्याबाबत मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महिला कुस्ती स्पर्धेला शासनाचा भक्कम पाठिंबा असल्याचे सांगितले.

हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजित महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा कुस्ती स्पर्धेच्या समारोप प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, सागर कल्याणशेट्टी, नगरसेविका रोहिणी तडवळकर, सुधा मोरे, अक्कलकोट अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले, स्वाती साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले की, कैलासवासी सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ आयोजित ही कुस्ती स्पर्धा महिलांच्या कुस्ती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. महाराष्ट्रातील रणरागिनींना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्याचे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. कुस्तीपटू गीता व बबीता फौगाट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले असून त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातील महिला खेळाडूही पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांनी हिंदकेसरी किताब पटकावला. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिब्बारे यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध – राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या प्रशासकीय इमारती

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत;३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत…

शेतीसाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांतील शासकीय ठेवी काढून घ्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील