vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई महापालिका मुख्यालयात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई महापालिका मुख्यालयात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, प्रतिनिधी: ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

हे प्रदर्शन १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृह परिसरात तसेच जुन्या व नव्या इमारतींना जोडणाऱ्या पुलावर आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात मंडळाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या ग्रामीण व लघुउद्योजकांच्या विविध दर्जेदार उत्पादनांची विक्री व मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये खादीचे रेडिमेड कपडे, मध, पापड, लोणची, विविध खाद्यपदार्थ, हाताने तयार केलेले कापडी व रेझिनचे दागिने, मॅग्नेट्स, आधुनिक चप्पल तसेच हस्तनिर्मित फुले आदी उत्पादनांचा समावेश आहे.

ग्रामीण कारागीर आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे आणि ग्राहकांपर्यंत स्थानिक उत्पादनांचा प्रसार करणे, हा या प्रदर्शनामागील उद्देश आहे.या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर आणि नित्यानंद पाटील उपस्थित होते.

मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

विदर्भ व मराठवाडा दूग्ध विकास प्रकल्पा अंतर्गत आता पशुपालकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे-अनुदानासाठी पशुपालकांनी विहित कालावधीत अर्ज करावेत -जिल्हाधिकारी

आडगाव सरक येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून दुष्काळी शेतीची पाहणी

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीयांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन  : सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर

ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना अटक

मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन;२० मे रोजी पुण्यात होणार गौरव

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta