vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

इयत्ता 10 वी व 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

इयत्ता 10 वी व 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार या पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकद्वारे अर्ज/प्रस्ताव ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

माध्यमिक (इ.10 वी) व उच्च माध्यमिक (इ.12 वी) फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, राज्य मंडळ, पुणे यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून ते विभागीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. यासाठी सर्व प्रस्ताव 15 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज भरताना काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी पोर्टलवरील टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच क्रीडा गुण प्रस्ताव सादरीकरणाबाबत अडचण असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जर कागदपत्रे अपूर्ण किंवा त्रुटीपूर्ण असल्यामुळे प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आला, तर संबंधित विद्यार्थी, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी घ्यावी. संबंधित शाळा व महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन करावे.

जिल्ह्यातील एकही पात्र खेळाडू क्रीडा सवलतीपासून वंचित राहू नये यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”**महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न*

vishwatmaklokswamivarta

खरपुडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीर! 

19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा महासभेत सन्मान