vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिल्हास्तरीय शालेय ‘हॅन्डबॉल’ स्पर्धेत नवी मुंबई शहरातून शाळांचा उदंड प्रतिसाद

जिल्हास्तरीय शालेय ‘हॅन्डबॉल’ स्पर्धेत नवी मुंबई शहरातून शाळांचा उदंड प्रतिसाद

         नवी मुंबई प्रतिनिधी-   नवी मुंबई महानगरपालिकेस शालेय क्रीडा स्पर्धांकरिता स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांचे सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ‘हॅन्डबॉल’ क्रीडा स्पर्धा २०२५-२६ उत्साहात संपन्न झाल्या
       हॅन्डबॉल खेळाच्या १४, १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील स्पर्धांचे न्यू होरायझन वर्ल्ड अकॅडमी, सेक्टर-२०, कोपरखैरणे येथे शाळेच्या मैदानावर नमुंमपा क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
     या स्पर्धेत नवी मुंबई शहरातून विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातून मुलामुलींच्या तब्बल ७१ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी न्यु होरायझन वर्ल्ड अकॅडमी, कोपरखैरणेच्या प्राचार्या श्रीम. सुजाता मेनन, नमुंमपा क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, नमुं जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन समिती सदस्य श्री.धनंजय वनमाळी, ठाणे जिल्हा हॅन्डबॉल असोसिएशन सचिव श्रीम. चैताली चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षक, शालेय खेळाडू व‌ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   १४ वर्षाआतील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी विबग्योर हायस्कूल, ऐरोली आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नेरुळ यांच्यात झालेल्या सामन्यात विबग्योर हायस्कुल, ऐरोली शाळेच्या संघाने १:० असे ०१ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.   दुसरी उपांत्य फेरी डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कुल, नेरुळ आणि सेंट झेवियर्स हायस्कूल, नेरुळ यांच्यात झालेल्या लढती मध्ये डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कुल, नेरुळ शाळेच्या शाळेच्या संघाने ३:२ असे ०१ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या गटातील अंतिम सामना विबग्योर हायस्कूल, ऐरोली आणि डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कुल, नेरुळ यांच्यात झालेल्या सामन्यात विबग्योर हायस्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने २:१ असे ०१ गोलने जिंकून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
   १७ वर्षाआतील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी रायन इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ आणि एस. एस. हायस्कूल, नेरुळ यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात रायन इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ शाळेच्या संघाने ९:४ असे ५ गोलच्या फरकाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
 दुसरी उपांत्य फेरी अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल, वाशी आणि डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कुल, नेरुळ यांच्यात झालेल्या लढती मध्ये अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल वाशी शाळेच्या संघाने ४:० असे ०४ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला
     या मुलांच्या गटातील अंतिम सामना अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल, वाशी आणि रायन इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल वाशी शाळेच्या संघाने २:१ असे ०१ गोलच्या फरकाने अजिंक्यपद पटकावून मुंबई विभागीयस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.   या स्पर्धेतील १९ वर्षाआतील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे आणि अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल, वाशी यांच्यात झालेल्या सामन्यात क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे शाळेच्या संघाने १:० असे ०१ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला     दुसरी उपांत्य फेरी साईनाथ कॉलेज, वाशी आणि तिलक ज्युनिअर कॉलेज, नेरुळ यांच्यात झालेल्या लढती मध्ये साईनाथ कॉलेज वाशीच्या संघाने १:० असे ०१ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
  या स्पर्धेतील १७ वर्षाआतील मुलांच्या गटातील अंतिम सामना क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे आणि साईनाथ कॉलेज वाशी यांच्यात झालेल्या अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे शाळेच्या संघाने १:० असे ०१ गोलने जिंकून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
    या स्पर्धेतील १४ वर्षाआतील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी विबग्योर हायस्कूल,ऐरोली आणि सेंट लॉरेन्स हायस्कूल, वाशी यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात विबग्योर हायस्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने १:० असे ०१ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.    दुसरी उपांत्य फेरी अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल वाशी आणि तिलक पब्लिक स्कूल नेरुळ यांच्यात झालेल्या लढती मध्ये अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल वाशी शाळेच्या संघाने २:० असे ०२ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला
        या मुलींच्या गटातील अंतिम सामना अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल, वाशी आणि विबग्योर हायस्कूल, ऐरोली यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कुल, वाशी शाळेच्या संघाने ६:१ असे गोल करत ५ गोलने अजिंक्यपद पटकावून मुंबई विभागीयस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.    या स्पर्धेतील १७ वर्षाआतील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी रायन इंटरनॅशनल स्कूल नेरुळ आणि सेंट झेवियर्स हायस्कूल, ऐरोली यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात रायन इंटरनॅशनल स्कूल नेरुळ शाळेच्या संघाने ६:१ असे ०५ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.  दुसरी उपांत्य फेरी अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल, वाशी आणि डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल,नेरुळ यांच्यात झालेल्या लढती मध्ये अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल वाशी शाळेच्या संघाने ६:३ असे ०३ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.   या मुलींच्या गटातील अंतिम सामना रायन इंटरनॅशनल स्कूल नेरुळ आणि अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल,वाशी यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात रायन इंटरनॅशनल स्कूल नेरुळ शाळेच्या संघाने ३:१ असे गोल करत २ गोलने अजिंक्यपद पटकावून मुंबई विभागीयस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.   या स्पर्धेतील १९ वर्षाआतील मुलींच्या गटात अंतिम अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल वाशी आणि तिलक ज्युनिअर कॉलेज,नेरूळ यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल वाशीच्या संघाने २:१ असे ०१ गोलने जिंकून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.   या स्पर्धा आयोजनासाठी न्यू होरायझन वर्ल्ड अकॅडमी कोपरखैरणे यांचे संचालक व प्राचार्य आणि ठाणे जिल्हा हॅन्डबॉल असोसिएशनचे मोलाचे सहकार्य लाभले  नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे क्रीडा विषयक बाबीवर विशेष प्रेम असून महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना सुविधा देण्यासाठी अग्रेसर आहेत.    जिल्हास्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेतील १४,१७ व १९ वर्षाआतील मुलामुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून पुढील मुंबई विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघांचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे व उपआयुक्त क्रीडा श्रीम.अभिलाषा पाटील यांनीही शुभेच्छा दिलेल्या आहेत.
00000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत  प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जलतरण क्रीडा प्रकारात प्रगत प्रशिक्षण

मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्र – निवड चाचण्यांसाठी१९ एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 26 जुनपर्यंत अर्ज करा

बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने #कबड्डी मध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरूप्रवेशासाठी २३ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन