vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

बनावट आधारकार्डावर बालविवाह करण्याचा प्रयत्न फसला‘चाईल्डलाईन’ची सतर्कता

बनावट आधारकार्डावर बालविवाह करण्याचा प्रयत्न फसला‘चाईल्डलाईन’ची सतर्कता

अकोला, प्रतिनिधी : बार्शीटाकळीनजिकच्या एका गावात बनावट आधारकार्डावर एका अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न चाईल्डलाईन व काही स्वयंसेवी संस्थांच्या सतर्कता व जलद कार्यवाहीमुळे फसला

बार्शीटाकळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात १७ वर्षीय मुलीचा विवाह २४ वर्षीय तरुणासोबत होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन, ‘ॲसेस टू जस्टीस’, आय. एस. डब्ल्यू. एस. यांना मिळाली. त्यांच्या टीमने धाडसी कारवाई करत हा विवाह तत्काळ थांबवला

या घटनेत मुलीचे आधीच्या आधारकार्ड वय १७ वर्ष असताना ते वाढवून बनावट कार्ड तयार केल्याचे आढळले. टीमने तत्काळ पोहोचून पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात आणले. संबंधितांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ बद्दल माहिती देऊन बाल विवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यानंतर प्रकरण अकोला येथील बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले. समुपदेशन आणि कडक इशारा देऊन बाल कल्याण समितीसमोर दोन्ही पक्षांची बैठक घेण्यात आली. यावेळी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.

अल्पवयीन वयात लग्न झाल्यास मुलीच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आयुष्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दोन्ही बाजूंच्या पालकांकडून “मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न लावणार नाही” अशा आशयाचे कायदेशीर हमीपत्र लिहून घेण्यात आले

ही यशस्वी कारवाई बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, ॲड. शीला तोष्णीवाल, प्रांजली जयस्वाल, बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, कम्युनिटी सोशल पूजा मनवर आदींनी केली

०००

संबंधित पोस्ट

बीडमधील हत्येप्रकरणी बातमी; दोन मुख्य आरोपींना अटक, संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही ताब्यात..

रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात नदीपात्रात मृत कोंबड्या टाकणाऱ्या अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल.

ईडीने ने केरळमधील करूवनूर सर्व्हिस कोऑपरेटिव बँक कर्ज घोटाळ्यात अंतिम आरोपपत्र दाखल केले.

मुंबई धारावीतील गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

नाशिक जिल्ह्यात खळबळजनक  धक्कादायक!बातमी- गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपी अटक

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील देवनारमध्ये अमली पदार्थांचा मोठा पर्दाफाश: दोन दिवसांत ₹19.78 लाख किमतीचा 94.494 किलो गांजा जप्त

vishwatmaklokswamivarta