vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत आहे. याच दिशेने ‘RuPay On-The-Go’, एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे, तसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट, इंटेलिजंट करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा शुभारंभ

राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न

साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा,चित्रलेखाचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

अमली पदार्थ विरोधी जनप्रबोधनासाठी गीत स्पर्धा, 51 हजाराचे बक्षीस- पालकमंत्री चंद्रकांत पाटील