vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ४५ हून अधिक ठिकाणी, सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ४५ हून अधिक ठिकाणी, सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

 

   मुंबई : प्रतिनिधी “आज संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, युगानुयुगे ज्या युद्धात मारुतिराय विराजमान झाले, तिथे विजय निश्चित झाला आहे! मग ते प्रभू श्रीरामांच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतिराय असोत, वा महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन अधर्माविरुद्ध पांडवांना बळ देणारे हनुमान असोत! इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’साठी समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना सुरू केली, त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ मिळाले.

  आज पुन्हा एकदा देश आणि धर्म संकटात असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा काळात प्रत्येक हिंदूमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी अन् येणाऱ्या भीषण आपत्काळात मारुतीरायांच्या आशीर्वादाने हिंदूंचा विजय सुनिश्चित व्हावा, याच संकल्पनेतून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत ४५ हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आदी राज्यांतील सामूहिक गदापूजनात हजारो युवकांनी सहभाग घेतला.

    गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ४ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला. यावेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा सहभागी झाले होते.डॉ. उदय धुरी,  हिंदू जनजागृति समिति

 

संबंधित पोस्ट

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामधल्या २० जणांवर ८१ लाख रुपयांचं इनाम जाहीर होतं. 

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये – जिल्हाधिकारी अशोक काकडे

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळे’चे उद्घाटन

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याकरीता रायगड जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन..