vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून घडतील उत्कृष्ट खेळाडू-कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर,बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलात उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ

क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून घडतील उत्कृष्ट खेळाडू-कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर,बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलात उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ

बुलढाणा प्रतिनिधी: उन्हाळी सुटीचा सदुपयोग करून मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने आयोजित ‘ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर’ हे भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास जिल्हा कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर यांनी व्यक्त केला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिराचा उद्घाटन सोहळा जिल्हा क्रीडा संकुल, जाभरून रोड येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा स्काऊट अँड गाईड अधिकारी कविता पवार आणि सुनील जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेघा बाहेकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिबिरार्थींना खेळाचे महत्त्व पटवून दिले व व्यक्तिमत्व विकासावर भर दिला. कविता पवार यांनी शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये खेळाची गोडी निर्माण करणे हा मुख्य उद्देश असून, विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिबिराचे स्वरूप आणि उपक्रम,जिल्हा क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांनी प्रास्ताविकात शिबिराच्या रूपरेषेबद्दल माहिती दिली. या शिबिरात केवळ मैदानी खेळच नव्हे, तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.यामध्ये ॲथलेटिक्स, हॅण्डबॉल, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स आणि स्पोर्ट्स नर्सरी, तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, वादविवाद, सामान्य ज्ञान, सुंदर हस्ताक्षर, नृत्य स्पर्धा आणि ॲरोबिक्स, लाठीकाठी, प्राणायाम, दंतचिकित्सा आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे.

हे शिबिर दोन सत्रांत चालणार असून सकाळी ६.१५ ते ८.१५ आणि सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत प्रशिक्षण दिले जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जीवन मोहोड यांनी, तर आभार प्रदर्शन उज्वला लांडगे यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

    0000

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्याने कायम राखली सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा-विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल

जागतिक स्कूल हॅालिबॅाल चॅम्पियनशिप; 15 वर्षाआतील मुला-मुलींकरीता निवड चाचणी…

राज्यस्तर शालेय बॉक्सिंगचा स्पर्धेचा थरार 26 सप्टेंबर पासून

vishwatmaklokswamivarta

21 ते 23 मार्च दरम्यान वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धानामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना नामी संधी…

राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा 2025-26 ( 14 वर्षे मुले व मुली ..

vishwatmaklokswamivarta

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन