vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*

*जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*

सातारा प्रतिनिधी- सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी ४ एप्रिल २०२६ रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये चार नामनिर्देशनपत्र दाखल झाली. छाननी अंती कोणाताही अक्षेप नसल्याने चारही नामनिर्देशनपत्रे स्वीकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले.

यामध्ये ऋतुजा विराज शिंदे यांनी महिला व बाल कल्याण सभापती पदासाठी, ऋषीकेश धायगुडे-पाटील यांनी समाज कल्याण समिती सभापती पदासाठी, लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशिल कदम यांनी विषय समिती सभापदी पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. चारही नामनिर्देशन पत्रे प्रत्येक पदासाठी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र आल्याने या चार जणांची निवड करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी घोषीत केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, तहसीलदार समीर यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आदी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत फेरीवाले, होर्डींग – बॅनर्स, वाहने यावर सातत्यपूर्ण धडक कारवाया

vishwatmaklokswamivarta

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

आता QR कोडद्वारे तक्रार-सुचना नोंदवा;प्रशासनाचे डिजीटल पाऊल

विविध योजनांचा लाभ घेण्याचे वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी’ कायदा -तात्काळ करण्याच्या मागणीला जोर धरला !हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने