vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

सोशल मीडिया’ वरील संशोधनासाठी माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांना पीएच.डी.

‘सोशल मीडिया’ वरील संशोधनासाठी माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांना पीएच.डी.

मुंबई प्रतिनिधी

राज्याचे माहिती आणि जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे यांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ‘वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन’ विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते श्री. गांगुर्डे यांना पीएच.डी. पदवीची अधिसूचना देऊन सन्मानित करण्यात आले

‘महाराष्ट्र शासनाच्या माहिती प्रसारणासाठी समाजमाध्यमांचा वापर आणि प्रभाव : एक अभ्यास’ (A Study on the Use and Impact of Social Media for Information Dissemination by the Government of Maharashtra) या विषयावर श्री. गांगुर्डे यांनी संशोधन करुन शोधप्रबंध सादर केला होता. शासनाचे निर्णय, लोकाभिमुख योजना, धोरणे आणि माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात समाजमाध्यमांची भूमिका किती प्रभावी ठरते, याचे सखोल विश्लेषण त्यांनी या संशोधनात केले आहे. या संशोधनासाठी त्यांना विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेचे माजी संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर यांचे मार्गदर्शन लाभले

राज्य शासनाच्या सेवेतील जनसंपर्क व प्रसिद्धीविषयक कामाचा दोन दशकांपेक्षा अधिक कालावधीचा अनुभव तसेच माहिती व जनसंपर्क विभागात सोशल मीडिया शाखेची त्यांनी केलेली सुरुवात यामुळे श्री. गांगुर्डे यांचे हे संशोधन महत्त्वाचे मानले जाते. शासकीय माहिती प्रसारासाठी शासनात सोशल मीडियाची सुरुवात करुन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल २०१८ मध्ये नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गांगुर्डे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी बसणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष शिथिलता देण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

vishwatmaklokswamivarta

नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण,• महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय• महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार..

पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) घाट ३ ते ६ जुलैदरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदअतिवृष्टी, भूस्खलन व दरड कोसळण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा