vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज होणार लोणार येथे योग महोत्सव बुलढाणा जिल्हयातील नागरीकांनी सहभागी होण्याचे केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन.

आज होणार लोणार येथे योग महोत्सव बुलढाणा जिल्हयातील नागरीकांनी सहभागी होण्याचे केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन.

 

बुलढाणा (प्रतिनीधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे ७५ दिवस बाकी असताना योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाच्या वतीने ७ एप्रिल ला योग महोत्सवाचे आयोजन लोणार येथे करण्यात आले आहे. या योग साधनेमध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. योग साधना (yoga sadhana) ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन आणि महान परंपरा आहे, जी केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद साधणारी एक जीवनशैली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरही योग साधनेचा स्वीकार केल्या जात आहे भारतीय योग साधनेला जागतिक स्तरावर पोचून भारतीय योग साधनेच्या माध्यमातून विश्वकल्याण व्हावे या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. २१ जून २०२६ ला 12 वा योग दिन साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या वतीने १०० दिवसाचे योग महोत्सव-२०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिला कार्यक्रम दिल्ली येथे झाला. दुसरा 75 दिवस बाकी असलेला काऊंट डाऊन योग महोत्सव कार्यक्रम 7 एप्रिल ला बुलढाणा जिल्हयातील जगप्रसिध्द लोणार सरोवर येथील छत्रपती शिवाजी महाराज उदयान येथे आयोजीत करण्यात आला आहे. या योग साधनेमध्ये 7 हजाराच्या अधिक योग साधक सहभागी होणार आहेत. या योग साधनेच्या माध्यमातुन ऐशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. एकाच वेळी त्रिकोणासन करणाऱ्या लोकांची सर्वाधीक संख्या राहणार आहे. अशी माहिती केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली या योग साधनेमध्ये इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनाईझेशन योग विद्या गुरुकूल क्रिडा भारती पतंजली योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हींग, लोणार येथील महिला बचत गट, शाळकरी विद्यार्थी

संबंधित पोस्ट

चेंबूर येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर चौघे विद्यार्थी जखमी,महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात दिली भेट जखमींची केली विचारपूस; मृत विद्यार्थ्याच्या पालकांप्रती संवेदना व्यक्त करून दिला धीर घटनेच्या चौकशीचे दिले निर्देश

जयंती दिनानिमित्त विशेष लेख-सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

गोवंश संरक्षणासाठी मार्गदर्शक सूचना जाहिर; अवैध वाहतूक, कत्तल व अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta