vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय राज्यमं त्री रामदास आठवले यांचा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार दौरा*  

*केंद्रीय राज्यमं त्री रामदास आठवले यांचा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार दौरा*

 

मुंबई प्रतिनिधी – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार दौरा सुरु आहे. रिपब्लिकन पक्ष हा भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चा प्रमुख घटक पक्ष आहे. एनडीए आघाडीतील राष्ट्रीय स्तरावरील दलित बहुजनांचा लोकप्रिय चेहरा म्हणून ना.रामदास आठवले यांच्या प्रचार सभांना पाचही राज्यांतून मागणी आहे.त्यामुळे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांसोबत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ना.रामदास आठवले दौरा करीत आहेत

सध्या आसाम, तामिळनाडु, पॉंडीचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पाचही राज्यातील भाजपचे आणि मित्रपक्षांचे उमेदवार ना.रामदास आठवले यांच्या प्रचार सभांची मागणी करीत आहेत. पश्चिम बंगाल हे एक मोठे राज्य असून भाजप आणि तृणमृल कॉग्रेसमध्ये तेथे मोठी लढत आहे. ममता दीदींच्या नेतृत्वात तृणमृल कॉग्रेस सरकारने बंगालला कंगाल केल्याचा आरोप ना. रामदास आठवले यांनी केला आहे.

उद्या मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी ना.रामदास आठवले हे पश्चिम बंगालमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी कोलकाता येथे दाखल होणार आहेत. पश्चिम बंगालमधील सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला आहे.

आसाममधील 126 पैकी 122 जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला आहे. आसाम मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात स्वबळावर लढत आहेत.गुवाहाटी येथे ना. रामदास आठवले यांनी आसाम विधानसभे साठी भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. पाँडिचेरी येथे ही भाजप एनडीए उमेदवारांचा प्रचार ना. रामदास आठवले यांनी केला. पाँडिचेरी मध्ये सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजप आणि एन आर काँग्रेस एनडीए उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. पाँडिचेरी मध्ये भाजप एन आर काँग्रेस चे सरकार निश्चित येणार असून रिपब्लिकन नेते ग्यानमूर्ती यांना पाँडिचेरी मध्ये एम एल सी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्ष पद देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

केरळमध्येही एका जागेवर रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार निवडणुक लढत असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे. पाँडेचेरीमध्ये सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्येही सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला आहे.

तामिळनाडुमध्ये रिपब्लिकन पक्षाने 40 जागांवर उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवणार असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा तामिळनाडुमध्ये भाजपला पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. उद्या मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी ना. रामदास आठवले पश्चिम बंगालच्या

दौ-यांवर असून तेथे ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.  पश्चिम बंगालचा दौरा केल्यानंतर ना.रामदास आठवले दिनांक 9 आणि 10 एप्रिल रोजी तामिळनाडुच्या दौ-यांवर राहणार आहेत.तामिळनाडुमधील कोईमतुर , तिरुप्पूर; ईरोड,नमक्कल, मदुराई ; दिंडीगुल आणि राजपलायम या जिल्ह्यांतील विविध विधानसभा मतदारसंघात ना. रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

आसाम, पश्चिम बंगाल, पाँडेचेरी, तामिळनाडु आणि केरळ या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ना. रामदास आठवले यांचाही प्रचाराचा झंझावात सुरु आहे. अनेक उमेदवार त्यांना प्रचारासाठी निमंत्रीत करीत आहेत.

 

हेमंत रणपिसे

प्रसिध्दीप्रमुख

संबंधित पोस्ट

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा “महाराष्ट्राची हिरकणी” म्हणून गौरव – क्रीडा सोयीसुविधांसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन

विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन – केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

राज्यातील इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा..