vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

साकीनाका बलात्कार : पीडितेच्या मुलींची जबाबदारी घ्यावी – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

साकीनाका बलात्कार : पीडितेच्या मुलींची जबाबदारी घ्यावी – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

मुंबई : साकीनाका येथे बलात्कार व अत्याचारानंतर मृत्यु झालेल्या महिलेच्या मुलींच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी तसेच त्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून आणि सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जावे, अशी सूचना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी राज्य सरकारला केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने चर्चेसाठी बोलावले. या घटनेकडे राज्य शासन गांभीर्याने पाहात असून पीडीतेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देवून तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल, असे आयोगास सांगितले.

पोलिसांच्या तपासावर समाधानराज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये, असे देखील स्पष्ट केले. तसेच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर अटॅक पासून जनतेचे करणार रक्षण-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन,बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल !- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक  

कल्याण-बदलापुरला पाण्याचा वेढा, कल्याणमध्ये 17 हजार 800 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पाणी पिऊन विजय चव्हाण यांनी सोडले उपोषण

vishwatmaklokswamivarta

देशात 2 लाख 35 हजार 532 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 870 जणांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

मुंबईत पोलिसांकडून कबुतर प्रेमींवर कठोर कारवाई