vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे महानगरपालिके चे आवाहन शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही..

ठाणे महानगरपालिके चे आवाहन शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही..

ठाणे प्रतिनिधी-

ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील माजिवडा जंक्शन येथे मुख्य जलवाहिनी मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सदरची गळती तातडीने बंद करणे आवश्यक आहे. या कामासाठी शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 ते रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे

      या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, रघुकुल, पारसिक नगर, आतकोनेश्वर नगर परिसर, पौंड पाडा, आतकोनेश्वर, खारेगाव, कळवा, मनिषानगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बसस्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा,पंचगंगा, राबोडी 1 व 2, आकाशगंगा, बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रह्मांड, रुतु सिटी, गोकुळनगर, आझादनगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, लोकमान्य नगर, इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुना गांव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा, ज्ञानेश्वरनगर परिसर, किसननगर नं. 3 परिसर, काकडे चाळ, कांदबरी सोसायटी, लोकदर्शन सोसायटी, परेरानगर, सुदर्शन कॉलनी परिसर, आझादनगर, गोकुळनगर, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकारआळी, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकरनगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंतविहार, लोकपुरम, लोकउपवन, देवदयानगर परिसर, कोकणी पाडा, वराडवाडी, शिवाईनगर, गावंडबाग, नीळकंठ, शास्त्रीनगर नं. 1 व 2, लक्ष्मीबाग, विहंगपार्क, मैत्रीपार्क, सिध्दांचल कॉम्प्लेक्स, वसंत विहार म्हाडा, वसंतविहार, माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकाळी, मनोरमानगर, रुणवाल, डोंगरपाडा, विजयनगर, विजयपार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, वर्तकनगरपरिसर, चिरागनगर, लोकमान्यनगर पाडा नं. 1, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवॉल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्नगर पाडा नं. 2, शास्त्रीनगर नं. 2, आर्य क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, समतानगर, वर्तकनगर, भीमनगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुलेनगर, गंगाधर नगर, वैतीवाडी, सिध्देश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळीमंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आझादनगर, खोपट, सिव्हील हॉस्प‍िटल परिसर, आंबेडकर रोड परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथनगर, डिसोझावाडी, कशीश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर, परबवाडी, इटर्निटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी, वागळे एमआयडीसी परिसर, केणीनगर, नेहरुनगर, किसननगर नं. 2 इत्यादी भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.

        सदर पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

माजिवडा जंक्शन सेवा रस्ता बंद,सदर कामाकरिता गोल्डन डाईज माजिवडा जंक्शन येथील सेवा रस्ता बंद ठेवावा लागणार असून याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

• आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करणे ही सामूहिक जबाबदारी : सरन्यायाधीश भूषण गवई नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि १४० वा वर्षपूर्ती सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

शस्त्र परवाना नुतीनकरण करुन घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे उद्घाटन; राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित

जालन्यात मोकाट कुत्रे व नागरी समस्यावर शिवसेना आक्रमक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलनभवानीनगर येथे मोकाट कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…