vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सव; ग्रंथविक्री, प्रदर्शनी व विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन..

आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सव; ग्रंथविक्री, प्रदर्शनी व विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन..

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दि. 18 आणि 19 मार्च 2025 रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गर्दे वाचनालयाच्या सभागृहातील या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, कविसंमेलन, व्याख्याने, तसेच विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवार, दि. 18 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता हुतात्मा स्मारकापासून गर्दे वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. साहित्यीक अर्चना देव यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश पांडे, शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष गोकुल शर्मा उपस्थित राहतील.

सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर तसेच आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, चैनसुख संचेती, डॉ.संजय कुटे, संजय गायकवाड, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 2.30 ते 5 वाजेदरम्यान “अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी” या विषयावर डॉ. एस. एम.कानडजे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होणार आहे. यामध्ये डॉ. गजानन जाधव, डॉ. कि.वा. वाघ, सुनिल वायाळ, नेमीनाथ सातपुते सहभागी होतील,ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता “कृत्रीम बुदधीमत्ता वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम” या विषयावर प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद. प्रमुख वक्ते डॉ.अरुण नन्हई, महेंद्र बोर्डे सहभागी होतील. दुपारी 1.30 वाजता “वाचन चळवळीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान” या विषयावर डॉ.अनंत सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राजेंद्र गणगे, देविदास समुद्रवार, सुनिल झोरे, अनंत सातव, रामेश्वर गायकी, विष्णू इंगळे सहभागी होतील. दुपारी 3 वाजता डॉ. सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन. यामध्ये नितीन वरणकार, अरविंद शिंगाडे, राम सोनोने, सर्जेराव चव्हाण, कडुबा बनसोडे, धनंजय मऱ्हे सहभागी होतील.

 दोन दिवशीय ग्रंथोत्सवाला जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच नागरिकांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

🚩 धर्मबंधुंनी-पुणे वडगावशेरीत ‘खंडित मूर्ती,प्रतिमा व निर्माल्य विसर्जन मोहीम’ राबवली:*

पोलिस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर ..शहरातील फळ विक्रेता आणि रमजान ईद संबंधी व्यापाऱ्यांना वाढवित वेळ देण्याबाबत निवेदन

प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण ९८२ जणांचा विविध पुरस्काराने सन्मान महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल – जिल्हाधिकारी अशोक काकडे  मूकबधीर विद्यार्थ्यांसाठीच्या 15 दिवसीय प्रशिक्षणाची सांगता.- राज्यातील पहिला उपक्रम

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

विधान परिषद प्रश्नोत्तरे :दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशी नंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे