vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माझ्या मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा एम आय डिसी कारेगाव पोलिसांचा डाव, आझाद मैदानात उपोषण 

माझ्या मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा एम आय डिसी कारेगाव पोलिसांचा डाव, आझाद मैदानात उपोषण.

मुंबई : प्रतिनिधी आम्ही पारधी समाजाचे असून मालकी हक्काच्या जमिनीतून निघणाऱ्या उत्पन्नावर मी माझे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत असून माझ्या 18 वर्षीय मुलाला सकट इतर दोन तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव एमआयडीसी पोलीस ठाणे कारेगाव रांजणगाव शिरूर जिल्हा पुणे या पोलिसांनी रचला असल्याची माहिती आझाद मैदानातील उपोषणकर्ते सुभाष बाळू काळे यांनी दिली. आदिवासी पारधी समाजातून असल्यामुळे पोलीस जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत आहेत. आमच्या जमिनी मध्ये दिवसभर काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह आम्ही करतो. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी माडगे आम्ही तर पोलिस रात्री-बेरात्री येथे येतात व घरात घुसून स्त्रिया आणि शाळेत जाणाऱ्या मुलांचे फोटो काढून घेतात.12 सप्टेंबर रोजी रात्री तीन ते साडेतीन च्या सुमारास पोलिस आले व त्यांनी आमचे अल्पवयीन मुले सचिन काळे, आकाश काळे, राहुल काळे, आदेश काळे या चार मुलांना पोलीस स्टेशन मध्ये घेणे जाऊन त्यांच्यावर चोरीच्या गुन्हे दाखल करण्याचा कट पोलिसांनी रचला आहे. आम्हाला संशय आहे की जी जमीन कसत आहोत त्या जमिनीचा भाव आता वधारला असल्याने काही धनदांडग्यांचा डोळा या जमिनीवर असल्याने पोलिसांमार्फत ते आम्हाला त्रास देत आहेत व या ठिकाणांना आम्हाला हुसकावून लावण्याचा त्यांनी कट रचला आहे. यासंदर्भात आम्ही पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे रीतसर तक्रार दिली असून संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आझाद मैदान येथे उपोषण सुरू केली असल्याचे सुभाष काळे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर…  

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चा निकाल घोषित-सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी पारितोषिक वितरण.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र; कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गतमौजे नाटोलीत प्रकल्पाचे भूमिपूजन- चौदा एकरावर ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प…

vishwatmaklokswamivarta

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta