vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा

लातूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा

लातूर, प्रतिनिधी : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) दैदिप्यमान इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ९ एप्रिल हा शौर्य दिन आज लातूर येथील सीआरपीएफ कँम्पमध्ये मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात आला.

९ एप्रिल १९६५ रोजी पाकिस्तानी सैन्याने गुजरातच्या कच्छ रणातील भारतीय चौक्यांवर कब्जा मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन डेजर्ट हॉक’ सुरू केले होते. यावेळी सीमेवरील ‘सरदार’ आणि ‘टाक’ या चौक्यांच्या रक्षणाची जबाबदारी सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनच्या जवानांवर होती. पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या एका बलाढ्य ब्रिगेडने अचानक हल्ला चढवला, मात्र संख्येने कमी असूनही सीआरपीएफच्या जवानांनी अत्यंत धाडसाने हा हल्ला परतावून लावला. सलग १२ तास चाललेल्या या ऐतिहासिक लढाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानी लष्कराचे ३४ जवान टिपले. एका निमलष्करी दलाने लष्कराच्या मोठ्या तुकडीला रोखून धरण्याची ही जगाच्या लष्करी इतिहासातील दुर्मिळ कामगिरी ठरली.

याच शौर्याचे स्मरण म्हणून आज लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक अमिरुल हसन अंसारी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या संबोधनात अंसारी यांनी जवानांच्या अतुलनीय धैर्याचा गौरव केला आणि उपस्थित सर्व जवानांना व त्यांच्या परिवाराला शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

****

संबंधित पोस्ट

पंतप्रधान मोदी भोपाळमध्ये विकास परिषदेचे उद्घाटन करणार

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील’कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास महादेवी पुन्हा नांदणीत येण्याची शक्यता..

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

रत्नागिरी अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड..

पुरीमध्ये चक्रीवादळ ‘मोंथा’चा परिणाम दिसू लागला आहे  जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे लाईफगार्ड आणि अग्निशमन विभागाने पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्यापासून आणि समुद्रात अंघोळ करण्यापासून रोखले आहे. सर्वांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन. 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम..