vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अवैध सावकारी पिळवणूकीच्या त्रासाच्या अनुषंगाने पिडीतांनी संपर्क साधण्याचे आवाहन

अवैध सावकारी पिळवणूकीच्या त्रासाच्या अनुषंगाने पिडीतांनी संपर्क साधण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी : सातारा जिल्हयात विना परवाना अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याबाबत निवेदने प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने सातारा जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जर एखादी व्यक्ती विना परवाना अवैधरित्या सावकारी व्यवसाय करित असेल व सदर अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिकडुन एखाद्या नागरिकाची पिळवणुक होत असेल तर अशा पिडीत नागरिकांनी याबाबत संबंधित तालुक्यातील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रे व पुराव्यानिशी गोपनीय तक्रार करण्याचे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सूद्रीक यांनी केले आहे.

पिडीतांच्या तक्रारी अर्जानुसार महाराष्ट्र सावकारी अधिनियम , २०१४ या नियमान्वये कारवाई करण्यात येणार असून अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडुन पीडीत व्यक्तीस जीवे मारण्याची धमकी, मारहाण दमदाटी, शिवीगाळ अशा स्वरुपात मानसिक व शारिरीक त्रास होत असल्यास संबंधित पिडीतांनी याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आवाहनही संजयकुमार सुद्रिक जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सातारा यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर. 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ..

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..