vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बारामती पोटनिवडणूक- उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा वाढला जोर

बारामती पोटनिवडणूक- उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा वाढला जोर

राज्य प्रतिनिधी-

बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजित पवार यांचा प्रचाराचा जोर वाढू लागला पहिल्या दिवसापासून प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला

क्षेत्र कन्हेरी इथून प्रचाराची सुरुवात केली  यावेळी श्री मारुतीरायाचे दर्शन घेऊन पुढे बारामतीकरांशी सुसंवाद साधला. मारुतीरायाचे कृपाशीर्वाद आणि तुम्हा सर्वांची साथ ही भावना मला बळ देणारी आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीतील विविध पक्षांचे मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते; त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसेच इतर पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.

आदरणीय अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहेत. दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठी काम केले, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन लोकविकासाची कामे केली. त्यांनी कठीण प्रसंगी ठाम निर्णय घेण्याची ताकद दाखवली. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमधून त्यांनी सर्वसामान्यांना, भगिनींना आधार दिला. अजित दादांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे कठीण आहे; त्यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी मी या पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभी आहे.

ही निवडणूक केवळ माझी एकटीची नसून बारामतीकरांच्या विश्वासाची, विकासाची आणि आपल्या एकत्रित भविष्यासाठीची आहे. ही निवडणूक लोकशाहीची आहे. प्रत्येक मताचा मी आदर करते. आदरणीय दादांनी आयुष्यभर जनतेसाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांवर आहे. जात, धर्म यापलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी व्यवस्थापन, उद्योग-व्यवसाय वाढ, रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत बारामतीला अधिक सक्षम आणि विकसित करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ताकद आहे. त्यांच्या सन्मान आणि सहभागासहच पुढील वाटचाल होईल, याची मी खात्री देते. कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन काम केले जाईल. प्रतिभावान कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देणारे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातील.

दादांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, येत्या २३ एप्रिल रोजी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून आशीर्वादरुपी तुमची मते मला मोठ्या संख्येने द्यावीत, अशी भावना बारामतीकरांकडे व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार – डॉ हर्षदीप कांबळे चवदार तळे सत्याग्रह दिन बार्टीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे केला साजरा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून सुरुवात*नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान्य खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे* *होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा**गोष्‍ट बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….*

vishwatmaklokswamivarta

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत केली द्विपक्षीय चर्चा

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*