vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

 सांगली, प्रतिनिधी भारत सरकारमार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यातील एक लाखापेक्षा अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करावी व प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यासाठी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड, इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, जुबिलांट फुडवर्क लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, डीसीएम श्रीराम लिमिटेड, बेअर क्रॉप सायन्स लिमिटेड या ०९ कंपन्यांमधील ७० जागेच्या संधी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या आहेत. या योजनेचा लाभ हा 18 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवारांना दिला जाणार आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या व कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या उमेदवारांसाठी असून पूर्ण वेळ नोकरी किंवा शिक्षण सुरू असणारे उमेदवार या योजनेसाठी अपात्र असतील.

अर्ज कसा करावा :- या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवर प्रोफाईल तयार करुन विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत इंटर्नशिप अर्ज करु शकतात. या योजने अंतर्गत उमेदवारांना 06 ते 09 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. त्यासोबत दरमहा 9000 रुपये विद्यावेतन मिळेल. याशिवाय इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर 6 हजार रूपये एकरकमी अनुदान तसेच प्रमाणपत्र दिले जाईल. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजय नगर, सांगली, दूरध्वनी क्र. ०२३३-२९९०३८३ येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक

सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत- पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती· जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा साठवण/थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ – जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा.