vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ व धर्मांतराचे षडयंत्र रोखा! – हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी,राष्ट्रघातकी आतंकवादी स्लीपर सेलची सखोल चौकशी करा !

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ व धर्मांतराचे षडयंत्र रोखा! – हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी,राष्ट्रघातकी आतंकवादी स्लीपर सेलची सखोल चौकशी करा !

राज्य प्रतिनिधी – नाशिक : येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस भक्षणाची सक्ती आणि नमाज पठणाचे जे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत, त्यामागील विखारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे ‘कॉर्पोरेट जिहाद’ असू शकते. यामागील ‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून नाशिकचे पोलीस आयुक्त यांच्यासह निफाड, येवला, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. यात अनेक ठिकाणी समितीच्या रणरागिणी या महिला शाखेतील युवती व महिलांची सहभाग लक्षणीय होता.

     सदर कंपनीत ७ आरोपींना अटक झाली आहे. नाशिकमध्ये ७ सापडले, तर अन्य शहरात किती असतील ? हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे ‘कॉर्पोरेट षड्यंत्र’ असू शकते. यामागील ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील व्यापक तपास होण्याची आवश्यकता आहे. ज्या कंपन्यांमध्ये हिंदू महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे ‘धार्मिक दहशत’ निर्माण केली जाते, अशा कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करून त्यांना टाळे ठोकण्यात यावे; तसेच राज्यातील सर्व आयटी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तात्काळ ‘विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभावविरोधी ऑडिट’ करण्याचे आदेश सरकारने द्यावेत.

    श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत जर ‘कॉर्पोरेट’च्या नावाखाली हिंदू महिलांची अब्रू लुटली जात असेल, तर हिंदू समाज शांत बसणार नाही. जर प्रशासनाने या नराधमांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर हिंदु जनजागृती समिती समस्त हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती (संपर्क: ७०२०३८३२६४)

000000

संबंधित पोस्ट

प्री, पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक झऱ्यांची गणना; आपल्या भागातील झऱ्यांची माहिती कळवा-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ 2.0 कार्यान्वित;जनतेसाठी अधिक सोयीस्कर आधुनिक सुविधा उपलब्ध होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट-जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले