vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आयसीयूचे लोकार्पण,शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन

शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आयसीयूचे लोकार्पण,शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन

सांगली, प्रतिनिधी): वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत आणि त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याची गरज पडू नये, हीच शासनाची भूमिका असून राज्यामध्ये शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण व केंद्र पुरस्कृत ईडब्ल्यूएस (EWS) योजनेअंतर्गत लेक्चर हॉल व वसतिगृहांच्या कामांचे भूमिपूजन, तसेच पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या अनुषंगाने पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या निधीमधून सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मंजूर करण्यात आले. त्यातील 5 मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाने सुमारे २० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. याचा गोरगरीब रूग्णांना फायदा होणार आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा मॉड्युलर आयसीयु राज्य शासनाच्या निधीतून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मोफत तसेच कमी पैशांमध्ये वैद्यकीय सुविधा देणे शक्य झाले आहे. राज्य शासनाने राज्यात पहिली डिजिटल ब्रेन अंन्जीओग्राफी मशीन मिरज मध्ये मंजूर करून सुरू केली आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे. याशिवाय रुग्णालयात लिथोट्रिप्सी, आधुनिक लॅप्रोस्कोपी, इको व सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ३ टेस्ला एमआरआय मशीनमुळे आतापर्यंत १५ हजारांहून अधिक रुग्णांना लाभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण व केंद्र पुरस्कृत ईडब्ल्यूएस (EWS) योजनेअंतर्गत लेक्चर हॉल व वसतिगृहांच्या कामांचे भूमिपूजन, तसेच पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या अनुषंगाने पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते.

00

संबंधित पोस्ट

विदर्भातील उद्योगवाढीच्या सर्व संभावनांचा कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री- सीआयआयच्या विदर्भ विभागीय कार्यालयाने अभ्यास करावा – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

🌧️ पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! 🚨छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पावसाळी नियंत्रण कक्षाचा मा. आयुक्तांनी आढावा घेत आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज•आषाढी वारीसाठी सर्व विभागांकडून सुविधांची व्यापक तयारी•डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहनीद्वारे वारी सोहळा पोहचणार जगभर

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी- पालकमंत्री शंभूराज देसाई

सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी ‘घाटी’ला ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार- पालकमंत्री संजय शिरसाट,स्मशानभुमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारांस १ कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय..

मलकापूर नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी,काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक

vishwatmaklokswamivarta