vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तृतीयपंथीयांच्या बेकायदेशीर कृत्यांना चाप लावण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू

तृतीयपंथीयांच्या बेकायदेशीर कृत्यांना चाप लावण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू

छत्रपतीसंभाजीनगर, प्रतिनिधी शहरातील नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचा विचार करता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. काही गट आणि तृतीयपंथीय एकटे किंवा गटाने एकत्र येत लोकवस्ती आणि रस्त्यावर लोकांना जबरदस्ती पैशाची मागणी करीत आहेत. अशा गैरवर्तन करणाऱ्या गट , तृतीयपंथीय यांच्याकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे. अशा त्रास देणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सदरील आदेश दि.१५ एप्रिल त२०२६ ते १३ जून २०२६ या कालावधीसाठी लागू राहतील.

 लग्नकार्य, धार्मिक विधी किंवा इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी निमंत्रणाशिवाय प्रवेश करण्यास आणि नागरिकांच्या निवासस्थानी किंवा आस्थापनांमध्ये जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच ट्रॅफिक जंक्शन, चौक आणि रस्त्यांवर एकत्र येऊन वाहनचालक किंवा प्रवाशांकडून पैसे मागण्यास तसेच नागरिकांना त्रास देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

 सण-उत्सव किंवा कुटुंबातील दुःखद प्रसंगी नागरिकांना धमकावून किंवा बळजबरीने जास्त पैशांची मागणी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे आणि बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे यांसारख्या कृत्यांवर आता कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले असून, आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आदेशाचे उल्लंघन करणारे कोणतेही व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत दंडनीय असेल असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदेशात नमूद केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई विमानतळाजवळ अद्ययावत अशी इनोव्हेशन सिटी विकसित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

दूरसंचार सल्लागार समितीची बैठक संपन्न – BSNL सेवांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थ विक्रेत्यांवर १९५ धाडी १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त; १९२ व्यक्तींना अटक

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू   – उपमुख्यमंत्री अजित पवार- विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश- प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे- डीपीसीचा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन..

देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta

कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा