vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

गडचिरोली, प्रतिनिधी: महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-2026 अंतर्गत जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी गडचिरोली येथे मतदान केंद्र क्रमांक 1/1 निश्चित करण्यात आले असून, ते जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जुने शल्य चिकित्सक कक्षाजवळ, तळमजला, कॉम्पलेक्स, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे असणार आहे.या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या पात्र मतदारांनी मतदानासाठी येताना ओळख पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. मतदारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व पात्र मतदारांना आवाहन केले आहे की, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर उपस्थित राहावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा.

संबंधित पोस्ट

अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना उद्या नियुक्तीपत्रे प्रदान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा

संगीत आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड्. आशिष शेलार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा-संयुक्त परीक्षा २ फेब्रुवारी रोजी; २०६६४ उमेदवारांची बैठक व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

vishwatmaklokswamivarta

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभभारत विकासाच्या अमर्याद संधींचा – उपराष्ट्रपती जगदीप धनखडप्राप्त ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी व्हावा-राज्यपाल राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta