vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन;२० मे रोजी पुण्यात होणार गौरव

‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन;२० मे रोजी पुण्यात होणार गौरव

लातूर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ सालासाठी ‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व या क्षेत्रातील मधपाळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून मंडळाने हा उपक्रम सुरू केला असून, यात मधमाशीपालनात दीर्घकाळ यशस्वीपणे काम करणाऱ्या मधपाळांचा सन्मान केला जातो. या पुरस्कार योजनेत प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये आणि तृतीय ५ हजार रुपये अशा स्वरूपाचे तीन पुरस्कार दिले जाणार असून, यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. या पुरस्कारांचे अर्ज प्रत्येक जिल्ह्याच्या खादी मंडळाच्या कार्यालयात किंवा मंडळाच्या www.mskvib.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. २० मे २०२६ रोजी ‘जागतिक मधमाशी दिना’च्या औचित्याने पुणे येथे एका भव्य समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. याविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय, लातूर ( दूरध्वनी क्रमांक ०२३८२-२२०१४४) किंवा मध संचालनालय, महाबळेश्वर (दूरध्वनी क्रमांक ०२१६८-२६०२६४) या क्रमांकावर संपर्क साधता येईल. जास्तीत जास्त मधपाळांनी या पुरस्कारासाठी आपली नामांकने पाठवावीत, असे आवाहन मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील व जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

अनेक वर्षांपासूनच्या सुराज्य अभियानच्या मागणीला यश !खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी कायदा करणार !- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य

स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांचा युवकांशी संवाद

नव्या मुंबईत विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छता दिंडी सोहळ्यात स्वच्छता व पावसाळी पाण्याच्या संग्रहण संदेशाचा जागर…

भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

vishwatmaklokswamivarta

रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले व्हावे – मंत्री ॲड. आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाची पाहणी..