vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ३.०’ चा तिसरा टप्पा सुरू; सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांची सुवर्णसंधी

‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ३.०’ चा तिसरा टप्पा सुरू; सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांची सुवर्णसंधी

बुलढाणा प्रतिनिधी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने’च्या (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता यावा आणि त्यांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये आणि आर्थिक लाभ: या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप कालावधीत उमेदवाराला दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. कामावर रुजू होताना उमेदवाराला ६ हजार रुपयांचे एकरकमी अर्थसाहाय्य मिळेल. ही इंटर्नशिप ६ ते ९ महिने कालावधीची असेल.

विविध क्षेत्रे: सेमीकंडक्टर, आयटी (IT), रिन्यूएबल एनर्जी यांसारख्या २० पेक्षा अधिक आधुनिक क्षेत्रांमधील ३००+ आघाडीच्या कंपन्यांमध्ये कामाची संधी उपलब्ध

पात्रतेचे निकष: अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. १० वी, १२ वी उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयटीआय(ITI), डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी(Postgraduate) किंवा एमबीए (MBA) केलेले तरुण यासाठी पात्र आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. उमेदवार सध्या कोणत्याही पूर्णवेळ नोकरीत नसावा.

अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ pminternship.mca.gov.in किंवा mybharat.gov.in वर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या पोर्टलवर जाऊन ‘Apply Now’ वर क्लिक करून आपली माहिती भरावी.

देशातील तरुणांना केवळ पदवी शिक्षण न देता त्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये मिळावीत, यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरेल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब पोलिसांच्या राज्य विशेष अभियान कक्षाने एक मोठी कारवाई करत एका खलिस्तानी दहशतवाद्याला अटक

vishwatmaklokswamivarta

महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटप

vishwatmaklokswamivarta

प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियानातील महिला रूग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करावेत  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta