vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जबाबदार पर्यटन’ विषयक पथनाट्याव्दारे जनजागृती कोकण विभागीय पर्यटन कार्यालयाचा उपक्रम

जबाबदार पर्यटन’ विषयक पथनाट्याव्दारे जनजागृती कोकण विभागीय पर्यटन कार्यालयाचा उपक्रम

नवी मुंबई ( प्रतिनिधी:- विभागीय पर्यटन कार्यालय, कोकण यांच्या वतीने ‘जबाबदार पर्यटन’ या संकल्पनेविषयी जनजागृती करण्यासाठी कोकण भवन इमारतीच्या आवारात पथनाट्य सादर करण्यात आले. हा उपक्रम Aasamant Benevolence Foundation पुरस्कृत असून, ‘जबाबदार पर्यटन’ या विषयावर आधारित होता

या पथनाट्यामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक पर्यटन आणि जबाबदार प्रवास याबाबत संदेश देण्यासाठी विभागीय पर्यटन कार्यालयाच्या टीमसह विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या पथनाट्याव्दारे सागरी किनाऱ्यांवरील स्वच्छता, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, प्रदूषण टाळणे आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली. पर्यटन स्थळे ही फक्त पाहण्याची ठिकाणे नसून, ती आपली जबाबदारी आहेत, हा महत्त्वपूर्ण संदेश देत ‘जबाबदार पर्यटक बना’ ही भूमिका मांडण्यात आली.

या प्रसंगी विभागीय पर्यटन कार्यालय, कोकणचे कर्मचारी हृषिकेश नारकर, वंदिता पावसे, सोनम पवार, पंकज सावंत, विठ्ठल अर्जुने तसेच कोकण भवन इमारतीतील विविध विभागांतील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ

आरटीई’ प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त पैसे मागितल्यास कारवाई करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी दादर येथे मूक निदर्शने..

vishwatmaklokswamivarta