vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आरटीई’ प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

आरटीई’ प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

 

ठाणे द प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे)- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे अवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

 आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते.

  गैरप्रकार निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ प्रशासन अधिकारी मनपा/ नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

      ठाणे जिल्ह्यात कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी बालकांच्या पालकांनी सहकार्य करावे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन केले आहे.000

संबंधित पोस्ट

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

vishwatmaklokswamivarta

जालन्यातल्या ऊसतोड मजुराच्या दोन मुली आणि एका मुलाची मुंबई पोलीस दलात निवड.

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची  मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांनावीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे