vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अभिप्राय कक्षामुळे पारदर्शक प्रशासनाची नवी दिशा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा राज्यस्तरीय सन्मानमहाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त सन्मान

अभिप्राय कक्षामुळे पारदर्शक प्रशासनाची नवी दिशा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा राज्यस्तरीय सन्मानमहाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त सन्मान

अहिल्यानगर, प्रतिनिधी सुस्पष्ट दृष्टी, प्रभावी अंमलबजावणी आणि जनसेवेसाठी असलेली कटिबद्धता यांतून साकारलेला ‘अभिप्राय कक्ष’ हा उपक्रम प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्व वृद्धिंगत करणारा ठरला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. जिल्ह्यासाठी ही अत्यंत भूषणावह बाब ठरली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्ह्यात दि. १ जुलै २०२५ पासून ‘अभिप्राय कक्ष’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांना सेवा देताना पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांतून लाभ घेतलेल्या प्रत्येक नागरिकाशी थेट संपर्क साधून त्यांचा अभिप्राय नोंदविला जातो. प्राप्त अभिप्रायाचा गांभीर्याने विचार करून आवश्यक असलेल्या प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही केली जाते.

या उपक्रमामुळे प्रशासन अधिक सजग, उत्तरदायी व कार्यक्षम बनत आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत १ लाख ५० हजार नागरिकांशी थेट संपर्क साधण्यात आला असून, प्राप्त झालेल्या ४९४ तक्रारींपैकी ३३३ तक्रारींचे यशस्वी निराकरण करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना सेवा अधिक जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने पुरविल्या जात आहेत.

विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचा संगम असलेला ‘अभिप्राय कक्ष’ हा उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासकीय कार्यक्षमतेचा नवा मापदंड ठरत आहे. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही अनुकरणीय आदर्श ठरू शकतो, हेच या राज्यस्तरीय सन्मानातून अधोरेखित होते.

00000

संबंधित पोस्ट

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची संदीप देशमुख यांनी घेतली शपथ

महिलांच्या सर्वसमावेशक सबलीकरणासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत- राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर- पीसीपीएनडीटी अंतर्गत धाडसत्र सुरू करा- बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करा- महिलांसाठी आवश्यक सोयी सुविधा द्या

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जाताना स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांची क्षमतावृध्दी कार्यशाळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेचा आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य; विद्यार्थीच करतील गावांचा कायापालट – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले