vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (#एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ

राज्य प्रतिनिधी-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (#एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन १४ मे २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आयोगाने ९ एप्रिल २०२६ रोजी जाहिरात (क्र. ०११/२०२६) प्रसिद्ध केली होती. त्यानुसार अर्ज प्रक्रिया सुरू असताना काही उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अर्ज सादरीकरणाची अंतिम मुदत आता १४ मे २०२६, रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

तसेच, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १४ मे २०२६ पर्यंतच ठेवण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत काढण्याची अंतिम तारीख १६ मे २०२६ असून, चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत १८ मे २०२६ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, ९ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ जाहिरातीतील इतर अटी व तरतुदींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. संबंधित शुद्धिपत्रक आणि मूळ जाहिरात आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याची माहिती उपसचिव सं. पां. देशमुख यांनी दिली आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात दि.१५ व १६ रोजीव्यसनमुक्तीचा जागर; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समिती सदस्यांशी साधला संवाद

बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी करा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी-अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा पत्रकारांचा जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,महापालिका आयुक्तांना ईशारा

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा…

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ• जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रसिध्दी मोहिमेची सुरुवात

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार देण्यास कटिबद्ध – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta