vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा संपन्न

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा संपन्न

नाशिक, प्रतिनिधी- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे विविध पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत असून, भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला. कुशावर्त तीर्थ येथे हा समारंभ पार पडला. त्यावेळी मंत्री श्री महाजन बोलत होते.

यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी महाराज, महामंत्री हरिगिरीजी महाराज, तसेच आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद सरस्वती, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता निलेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, कार्यकारी अभियंता वैभव भागवत (पालखेड), तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

.कुशावर्त तीर्थावर ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा आज वैदिक मंत्रोच्चारात व भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय आखाडा परिषद व पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर यांच्यावतीने करण्यात आले. यामध्ये जुना आखाडा, निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आनंद आखाडा, आवाहन आखाडा, अटल आखाडा, बड़ा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाडा, निर्मल आखाडा आदींचा सहभाग होता.मंत्री श्री महाजन यांनी केली त्र्यंबकेश्वर परिसरातील कुंभमेळा व पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी

मंत्री महाजन यांनी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देत कामांची प्रगती तपासली. यात गोदावरी घाट बांधकाम व डीपी रोड कामे, त्र्यंबकेश्वर-गोदावरी लिंक योजना, बिल्व तीर्थ, त्र्यंबकेश्वर परिसरातील विकेंद्रित पाणीसंस्था पूर्णपणे भरण्यासाठी तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील गोदावरी नदी कायमस्वरूपी प्रवाहित राहण्यासाठी गोदावरी नदीवरून त्र्यंबकेश्वर उचल पाणी प्रणाली योजना यांची पाहणी केली.मंत्री श्री महाजन यांनी अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

0000000

संबंधित पोस्ट

समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधून जिल्हाभरात वृक्ष लागवडीस प्रारंभ वृक्ष जगवा, माणूस जगेल- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अणवाणी, दुचाकीवरुन गाठला शेतकऱ्यांचा बांध**परिस्थितीचा आढावा घेऊन दिला धीर*

vishwatmaklokswamivarta

राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होणार

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील तिन गावांसाठी टँकर मंजूर

नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र -जनगणना २०२७: घरयादी व घरगणनेचा पहिला टप्पा! 🇮🇳 एक मे 20 26 पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू