vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इंदिरानगर मध्ये पीआर कार्ड सर्वेक्षणाचा जालना मनपाकडून शुभारंभ–निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता – स्थायी सभापती अशोक पांगारकर

इंदिरानगर मध्ये पीआर कार्ड सर्वेक्षणाचा जालना मनपाकडून शुभारंभ–निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता – स्थायी सभापती अशोक पांगारकर

—————————————

जालना (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग १४ मधील इंदिरानगर भागातील रहिवाशांना त्यांच्या घरांचे हक्काचे पीआर कार्ड देण्यासाठी जालना शहर महानगर पालिकेच्या वतीने सर्वेक्षणाचा शुभारंभ आज सोमवारी स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आला.

जालना शहर महानगरपालिका हद्दीतील जवळपास ४२ झोपडपट्टी भागात वर्षानुवर्ष घर बांधून राहणारे हजारो रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घराचे पीआर कार्ड मिळावे यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, माजी आ.कैलास गोरंट्याल, भाजपाचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी मागील वर्षभरापासून शासनस्तरावर सतत पाठपुरावा केल्यानंतर जालना मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात भाजपाचे प्रभाग १३ आणि १४ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जालन्यातील सर्वच झोपडपट्टी भागातील रहिवाशांना पीआर कार्ड देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक काळात दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यासाठी आज सोमवारी प्रभागातील इंदिरानगर भागात पीआर कार्ड देण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला असून या सर्वेक्षणात सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांनी यावेळी दिली. याप्रसंगी प्रभागातील नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर, नगरसेवक शशिकांत घुगे, संतोष जमधडे, मनोज झीने, राजू पवार, सर्वेक्षण टीमचे रवी इंगळे, लक्ष्मण खाडे, दत्ता जाधव व इंदिरानगर भागातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, सर्वेक्षणाचे काम सुरू झाल्यामुळे येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय-पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईतील जयहिंद कॉलेज चर्चगेट विद्यार्थ्यांमार्फत धारावीतील मुलांच्या विविध स्पर्धा चे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची उद्या भाजपचे सुवेंदु कुमार शपथ घेणार*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार*  

वेव्हज् 2025′ अंतर्गत ‘वंडरमेंट – ए.आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट’ सांगीतिक कार्यक्रमानंतर डॉ. डी वाय पाटील स्टेडियम परिसरात रात्रीच विशेष स्वच्छता मोहीम,रस्त्यावरून 2 टन व स्टेडियम परिसरातून 5.5 टन कचरा संकलन