vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची उद्या भाजपचे सुवेंदु कुमार शपथ घेणार*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार*  

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची उद्या भाजपचे सुवेंदु कुमार शपथ घेणार*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार*

मुंबई प्रतिनिधी – तृणमूल काँग्रेस च्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे भाजपचे प्रमुख नेते सुवेंदु कुमार हे उद्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. उद्या दिनांक 9 मे रोजी सकाळी 11 वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाचा शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रमुख नेते सुवेंदु कुमार हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास महाराष्ट्रातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

भाजप नेते सुवेंदु कुमार यांच्या पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आज रात्रीच ना.रामदास आठवले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत कोलकाता येथे रवाना झाले आहेत. उद्या शनिवारी सकाळी होणा-या सुवेंदु कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथग्रहण सोहळयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शपथग्रहण सोहळयास उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दोन्ही नेते संध्याकाळी मुंबईत एकत्र परतणार आहेत.

 पश्चिम बंगालमधील भाजपचा विजय हा ऐतिहासीक विजय आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला निवडणुक प्रचार हा घनघोर युध्दासारखा भाजपसाठी होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक प्रचारात रिपब्लिकन पक्षाने सर्व जागांवर भाजपला पाठिंबा दिलेला होता. दोन टप्प्यात झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार केला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम बंगालच्या निवडणुक प्रचारात अनेक सभांना संबोधीत केले होते. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झालेला प्रचंड विजय हा ऐतिहासिक विजय ठरलेला आहे. त्यामुळे भाजपचे प्रमुख नेते सुवेंदु कुमार यांच्या शपथग्रहण सोहळयास महाराष्ट्रातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र परिवहन विभाग-  डेडलाईन संपली आता कारवाई सुरु, HSRP बद्दल RTO कडून पोलिसांकडून विशेष मोहीम..

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

आषाढी पालखी सोहळा-२०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

सरदार@१५० एकता अभियानात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे – क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे युवांच्या सहभागाने लवकरच राज्याचे सर्वंकष युवा धोरण साकारणार; युवक-युवतींना सूचना देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत