vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा जिल्हास्तरीय आढावा

महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा जिल्हास्तरीय आढावा

बुलढाणा, प्रतिनिधी: मा. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, बाल संरक्षण विषयक उपक्रम तसेच विभागीय समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महिला व बालकांच्या संरक्षण, पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य व कल्याणासाठी विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागांमध्ये अधिक समन्वय राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.

बैठकीदरम्यान बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, महिला सक्षमीकरण तसेच शिक्षण व आरोग्यविषयक उपक्रम अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्तपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

सदर बैठकीचे सचिव म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. अमोल दिघोळे यांनी कामकाज पाहिले. बैठकीच्या शेवटी त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

0000

संबंधित पोस्ट

निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ..

मुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करा – माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

वाळू मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत..

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश