vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन ;पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन ;पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

बुलढाणा प्रतिनिधी: राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत अन्नधान्य पिके तसेच वाणिज्य पिके (कापूस) सन २०२६-२७ या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिके आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे संच वाटप (मिनीकीट वितरण) कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिके गटांचे अर्ज, प्रमाणित बियाणे वितरण तसेच बियाणे संच वाटप (मिनीकीट वितरण) या घटकांसाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन “बियाणे” या घटकांतर्गत ऑनलाईन अर्ज करावेत. “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर अर्जांची निवड करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बुलढाणा श्री. संतोष डाबरे यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेला राज्यशासनाच्यावतीने गती-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· *नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण*

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या  खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द तक्रार करा..

रायगडमधील प्रलंबित रस्ते कामांना गती द्या-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन तातडीने पूर्ण करावे– मंत्री आदिती तटकरे

भामरागड तालुक्यात स्वामित्व योजनेला वेग; १० गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण मालकी हक्काच्या सनद वाटपाचा मार्ग मोकळा

कर्जत व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी-महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे संचालक (पणन) यांना निर्देश