vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वेध विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिका-यांकडून पूर्वतयारीचा आढावा.

वेध विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिका-यांकडून पूर्वतयारीचा आढावा

अकोला, प्रतिनिधी: निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने समन्वय अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली.

निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, न. प. प्रशासन अधिकारी विश्वनाथ वडजे, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, श्रीनिधी वाजपेयी आदी उपस्थित होते.

अचूक, अद्ययावत व पारदर्शक मतदार यादी तयार करणे ही लोकशाही प्रक्रियेची अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षण, नियोजन आदी बाबींच्या अनुषंगाने मनुष्यबळ व इतर यंत्रणा सुसज्ज असावी. समन्वय अधिका-यांनी संनियंत्रण व समन्वयनाची जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

मयत, दुबार, कायम स्थलांतरितांची नावे वगळणे, मॅपिंग, उपलब्ध मनुष्यबळ, प्रशिक्षक, प्रशिक्षण, ‘बुक अ कॉल’ उपक्रम, पुनरीक्षण फॉर्म, अपेक्षित कामे आदी विविध बाबींविषयी यावेळी चर्चा झाली. श्री. परंडेकर यांनी सादरीकरण केले.

०००

संबंधित पोस्ट

ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’इंडिया रायझिंग’ आणि ‘जिओ ब्लास्ट’मुळे भारतीय युवा गेमर्ससाठी जागतिक व्यासपीठ खुले..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी (दि. ९)

मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर.

माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांचे निधन

देशभरात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सक्रिय देखरेख…

जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी;लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह