vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्विनी भिडे यांचे निर्देश*  

महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्विनी भिडे यांचे निर्देश*

मुंबई प्रतिनिधी-

 मुंबईकरांच्या आरोग्यसेवेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची सुमारे ५०० हून अधिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे, ‘हिंदुहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृहे, विशेषोपचार रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. दरवर्षी सुमारे दोन कोटींहून अधिक नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतात. महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांचा विस्तार, आधुनिकता आणि वैद्यकीय सेवांची गुणवत्ता सातत्याने अधिक सक्षम व उंचावत आहे. मात्र, उत्कृष्ट आरोग्यसेवेसोबतच या सर्व आरोग्य संस्थांचा परिसरही स्वच्छ, अतिक्रमणमुक्त आणि नागरिकांच्या दैनंदिन वावरासाठी सुसज्ज असणे तितकेच महत्त्वाचे आहे. दवाखाने व रुग्णालयांच्या इमारती आकर्षक, एकसमान रंगसंगतीने उठावदार दिसाव्यात, परिसरात स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीमुळे या आरोग्य संस्थांचे दर्जेदार स्वरूप कायम राखले जावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. प्रशासकीय विभागांच्‍या (वॉर्ड) सहायक आयुक्‍तांनी विविध आरोग्‍य संस्‍थांना स्‍वयंप्रेरणेने भेट देऊन परिसर स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, दुरुस्तीची कामे, रंगसंगती आणि नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करावी व आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असेही निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.

00000

संबंधित पोस्ट

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) फेब्रु मार्च 2026 परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखा

vishwatmaklokswamivarta

अखेर अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी निर्माता आणि राकेश सारंग दिग्दर्शक यांना न्याय मिळाला. 

शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्नांना मिळणार व्यासपीठ;पालकमंत्री चंद्रकांत पाटील साधणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी..

पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील ३ ते ४ तासांत जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

vishwatmaklokswamivarta