vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात अनधिकृतरित्या उभारलेल्या तात्पुरत्या संरचना, बांधकाम, टर्फ निष्कासित करण्याची कारवाई सुरू*

मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात अनधिकृतरित्या उभारलेल्या तात्पुरत्या संरचना, बांधकाम, टर्फ निष्कासित करण्याची कारवाई सुरू*

मुंबई प्रतिनिधी-मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरात अनधिकृतरित्या उभारलेल्या तात्पुरत्या संरचना आणि बांधकाम, टर्फ यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभाग कार्यालयाने आज (दिनांक १६ मे २०२६) पासून निष्कासनाची कारवाई सुरू केली आहे.मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे काल (दिनांक १५ मे २०२६) बैठक झाली. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल तसेच कालिदास नाट्यगृह कामकाजाच्या अनुषंगाने पुनर्रचना आणि सुधार करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर परिसरात पाहणी करण्यात आली. या बैठकीस आणि पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत आमदार श्री. मिहिर कोटेचा, माजी खासदार श्री. किरीट सोमय्या, माजी खासदार श्री. मनोज कोटक, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती साक्षी दळवी, नगरसेविका श्रीमती दीपिका घाग, नगरसेविका श्रीमती हेतल गाला – मोरवेकर, नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांच्यासह उपआयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार आंबी, सहाय्यक आयुक्त श्रीमती समरीन सय्यद आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

.0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ,निवडणुकीतून 4 उमेदवारांची माघार, रिंगणात 3 उमेदवार..

धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· स्थानिक कारागिरांच्या पुर्नवसनाला सर्वोच्च प्राधान्य· धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजूरी..

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

रस्ते सुरक्षा अभियान विशेष लेख-

vishwatmaklokswamivarta

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी इथं फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी …

vishwatmaklokswamivarta