vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणी प्रस्तावास गती – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे जेट्टीमुळे दापोली तालुक्यातील मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना

बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणी प्रस्तावास गती – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे-जेट्टीमुळे दापोली तालुक्यातील मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना.

मुंबई प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या, जेट्टी उभारणीची आवश्यकता तसेच मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

बुरोंडी (ता.दापोली) मच्छीमार जेट्टी संदर्भात आयोजित बैठकीत मत्स्यव्यवसाय मंत्री राणे बोलत होते. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, केदार साठे, शिवानी गावकर, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सागरी जिल्हा असून जिल्ह्याला तब्बल २३७ किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. मिरकरवाडा बंदरानंतर दापोली तालुक्यातील हर्णे बंदराला विशेष महत्त्व आहे. हर्णे, दाभोळ आणि बुरोंडी ही मासळी उतरविण्याची प्रमुख केंद्रे मानली जातात.

बुरोंडी येथील मच्छीमारांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या असून मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. बुरोंडी येथे जेट्टी उभारल्यास वाहतूक खर्च कमी होईल, मासळीचा दर्जा टिकून राहील आणि स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल. जेट्टीमुळे मच्छीमारांना मासळी थेट उतरविणे शक्य होईल. डिझेल, पाणी आणि इतर साहित्य सहज उपलब्ध होईल. वादळी हवामानात नौकांना सुरक्षित आश्रय मिळेल. तसेच पर्यटन आणि व्यापारानाही चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले.

फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (एफआयडीएफ) या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत हर्णे मत्स्य बंदर विकासाचे काम सुरू असून, त्याच धर्तीवर बुरोंडी येथेही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न केले जात आहे. बुरोंडी जेट्टी प्रकल्पामुळे दापोली तालुक्यातील मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी सांगितले.

बुरोंडी हे मोठे मच्छीमार गाव असून येथील लोकसंख्या ७ ते ८ हजारांच्या दरम्यान आहे. गावात नोंदणीकृत मच्छीमार सहकारी संस्था कार्यरत असून २५०२ सभासद या संस्थेशी जोडलेले आहेत. बुरोंडी परिसरात सुमारे १०० नोंदणीकृत मासेमारी नौका असून त्यामध्ये एक व दोन सिलेंडरच्या नौकांची संख्या अधिक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

संबंधित पोस्ट

प्रयागराजच्या महाकुंभ मेळा क्षेत्रातून हिंदू संघटनांची केंद्र सरकारकडे मागणी!*_*केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश नव्हे, तर संपूर्ण जगातील पीडित हिंदूंना भारतात आश्रय मिळावा!*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात साजरा,पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली जलरक्षक शपथ..

जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित

प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण विभाग आढावा बैठकीत पिंक शाळा, शिष्यवृत्ती, शिक्षक समायोजन आदी विषयांवर सखोल चर्चा

श्रमिक हो.. घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta