vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव 20 मेपर्यंत सादर करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव 20 मेपर्यंत सादर करण्याचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी : फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडा सवलत गुण वाढीचे प्रस्ताव ‘आपले सरकार’ पोर्टलवर तसेच संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते.

मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे तसेच त्रुटींअभावी हे प्रस्ताव विहित मुदतीत लातूर विभागीय मंडळाकडे प्राप्त झाले नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात आलेले नाहीत.

अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शिफारसीसह 20 मे 2026 पर्यंत लातूर विभागीय मंडळाकडे सादर करावेत, असे आवाहन विभागीय सचिव अनुपमा भंडारी यांनी केले आहे.

निर्धारित मुदतीनंतर कोणतेही प्रस्ताव स्वीकारले जाणार नसल्याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या एफआयएच महिला नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले

68 व्या राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धे करिता महाराष्ट्र संघ झारखंड (रांची) येथे रवाना.

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जलतरण क्रीडा प्रकारात प्रगत प्रशिक्षण

५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस फायर गेम साठी किशोर डांगे यांची निवड..

vishwatmaklokswamivarta

दर्श सुराणा यांचे दुहेरी सुवर्णपदक विजेतेपद,IES ओरियन स्कूल, दादर येथील अंडर-१० गटातील खेळाडूने ४०० मी. व ८०० मी. स्पर्धेत गाजवली बाजी